पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) शिरगाव,
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना गहुंजे येथील लोढा बेलमेंडो सोसायटीत घडली.
अनुपकुमार सतीषचंद सक्सेना (वय ६६, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी सोमवारी (दि. १२) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल नंबर ९५१८०५०९६९ शिवांश सिंग, मोबाइल धारक ८१२५२७०३५८ जेसिका एवेलिना, मोबाइल धारक ९०३२९७२७२५ सुरेश कुमार, मोबाइल नंबर धारक ९८२१६२०७९५ (नाव माहित नाही), मोबाइल धारक ८१२५०७४९२१ (नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत गहुंजे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. फिर्यादी यांना एक कोटी ५३ लाख ९५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांचे पैसे व नफा परत न देता आर्थिक फसवणूक केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.