ज्येष्ठ नागरिकाची एलआयसी सरेंडर करण्यास भाग पाडून पावणे नऊ लाखांची फसवणूक

0
127

एका 62 वर्षीय नागरिकांची 9 लाख रुपयांची एल आय सी सरेंडर करून तीच रक्कम आय एफ सी आय लाईफ बाँड मध्ये गुंतवण्यास सांगून नागरिकांची तब्बल पावणे नऊ लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 13 मे 2023 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत बावधन येथे घडली आहे.

याप्रकरणी 62 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मोबाईल धारक 7058377794,9028422763 ,दीपक जाधव,गणेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांची नऊ लाख रुपयांचे एलआयसी सरेंडर करून आय एफ सी आय लाईक बोंड मध्ये रक्कम गुंतवल्यास अकरा पॉईंट दोन टक्क्याने व्याज देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांनी फिर्यादींची नऊ लाख रुपयांचे एलआयसीचे रक्कम गुंतवण्यास भाग पाडली. त्यातील 24 हजार 795 रुपये परत करत फिर्यादी यांचे तब्बल 8 लाख 75 हजार 205 रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून जोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.