ज्या देशात इलेक्ट्रॉनिक मशीनमधील मतं बदलल्या जाऊ शकतात, तिथं काही पण होऊ शकतं

0
20

मुंबई, दि. १२ –
नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संकेत बावनकुळे याला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आता बीफ प्रकरणावरून विरोधकांनी पुन्हा मोर्चा उघडला आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या देशात इलेक्ट्रॉनिक मशीनमधील मतं बदलल्या जाऊ शकतात, तिथं काही पण होऊ शकतं असा टोला राऊत यांनी लगावला.

आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांना दोष देत नाही. पण भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत आपल्या विरोधकांच्या कुटुंबावर खास करून ज्या पद्धतीने खोटे दळभद्री आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तुरुंगात पाठवले. आज तीच परिस्थिती भारतीय जनता च्या पक्षाच्या काही नेत्यांवरती आली आहे. त्यांच्यामुळे कौटुंबिक यातना काय असतात हे भारतीय जनता पक्षाला हळूहळू कळत जाईल. शहा राजकारण, राजकीय बदल्यांच राजकारण कुटुंबियापर्यंत पोचू नये या मताचे आम्ही आहोत. पण हे संस्कृती तोडण्याचं काम केले भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात… खास करून देवेंद्र फडणीस यांच्या हाती राज्याचे सूत्र गेल्यावर, असा आरोप राऊत यांनी केला.
त्या गाडीत बिल मिळाले असं समाज माध्यमावर सर्वत्र चर्चा आहे आणि त्या बिलामध्ये बीफचा उल्लेख होता. पोलिसांना बिल जप्त करायला आणि बिल काढायला चार दिवस का लागले? गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली. पोलीस त्यावरती बोलत नाही. गाडी कोणाची याचे FIR मध्ये उल्लेख नाही. गाडीतील मेडिकल रिपोट त्यात उल्लेख नाही. या सगळ्या गोष्टींविषयी पोलीस सारवा सारव करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

मात्र बीफचा उल्लेख आल्यावर पोलीस पुढे येऊन सांगत आहे असं काहीही नाही. ज्या इलेक्ट्रॉनिक मशीनमधील मत बदलले जाऊ शकतात. भाजपला सर्व सोपं आहे. ज्या देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक मधील मतं बदलली जाऊ शकतात. त्या देशांमध्ये काही होऊ शकते, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही या गोष्टीवर विश्वास नाही. ठीक आहे हा पोलीस तपासाचा विषय आहे, असे ते म्हणाले.