ज्याने जी जागा जिंकली ती त्याला, महायुतीचा फॉर्म्युला

0
241

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजपच्या महाशक्तीला आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची साथ मिळाली असल्याने महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याची व्यूहरचना करा, असा निरोप असून ज्याने जी जागा जिंकली ती त्याला असा फॉर्म्युला समोर आला आहे. मुख्यालयाच्या निरोपानंतर महायुतीत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे एकमेव सुनिल तटकरे यांची रायगडची जागा हातात आहेत. बारामती, शिरूर, सातारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याने तिथेही दादांचाच उमेदवार की भाजप लढणार याबाबत संभ्रम आहे.

जागावाटपाबद्दल प्रारंभिक चर्चा मुंबईत करा, असा दिल्लीहून निरोप आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील विद्यमान सत्तासमीकरण तसेच ठेवून ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच पक्षाने लढवाव्यात, असा विचार समोर आल्याचे समजते.

महायुतीत ज्याने जागा जिंकली त्यानेच ती लढवावी, अशी प्रारंभिक चर्चा झाल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. मात्र ही चर्चा अगदीच प्रारंभिक होती. राममंदिराचे वातावरण कसे तयार करता येईल, कसे कार्यक्रम करता येतील, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

भाजपने किमान २८ ते ३० जागा लढवाव्यात, असा एक मतप्रवाह आहे. अजित पवार गटाकडे सध्या एकच खासदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व जागा त्यांनी लढवाव्यात का, यावरही विचार करण्यात आला. भाजपमध्ये जागांबाबत महाराष्ट्राच्या नेत्यात लवकरच विचारमंथन होणार आहे; मात्र सध्या ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच्याच, हे सूत्र लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांत सभा घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

५१ टक्के मते मिळवणे हे उद्दिष्ट भाजपने सहकारी मित्रपक्षांसमोर ठेवले आहे.भाजपने किमान २८ ते ३० जागा लढवाव्यात, असा एक मतप्रवाह आहे. अजित पवार गटाकडे सध्या एकच खासदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या सर्व जागा त्यांनी लढवाव्यात का, यावरही विचार करण्यात आला. भाजपमध्ये जागांबाबत महाराष्ट्राच्या नेत्यात लवकरच विचारमंथन होणार आहे; मात्र सध्या ज्याने ज्या जागा जिंकल्या त्या त्याच्याच, हे सूत्र लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात असलेल्या खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांत सभा घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ५१ टक्के मते मिळवणे हे उद्दिष्ट भाजपने सहकारी मित्रपक्षांसमोर ठेवले आहे.