ज्यांनी काँग्रेसला चले जाव म्हटलं तेच म्हणताहेत, आता राहुलशिवाय पर्याय नाही – योगेंद्र यादव

0
388

नवी दिल्ली, दि.९(पीसीबी) – गेल्या महिनाभरापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरदार सुरू असून ती सध्या कर्नाटकात आहे. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेचं विश्वेषणकरताना अनेक राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अर्थ काढले गेले आहेत. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांच्याएवढा प्रामाणिक नेता मी कधीच पाहिला नसल्याचे सांगत त्यांचा गौरवच केला आहे.

यावेळी योगेंद्र यादव यांना सवाल करण्यात आला की, काही वर्षांपूर्वीपर्यंत तुम्ही काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आणि आता या यात्रेत सहभागी झाला, त्यामुळे असा काय अचानक तुमच्यामध्ये बदल झाला.त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, सध्या देश मोठ्या संकटात आहे, त्यामुळे आज देश अशा वळणावर उभा आहे की आणि तीन वर्षांनी देशाचे संविधान राहिल की नाही हे आताच सांगता येणार नाही.

त्यामुळे आता छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. तसेच ते म्हणाले की, मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी म्हटले होते की काँग्रेस आता बंद करा.मात्र त्यावेळीही मी राहुल गांधी यांच्याबद्दल बोललो होतो आणि आजही तेच पुन्हा सांगतोय की, राहुल गांधींइतका प्रामाणिक नेता मी या देशात पाहिला नाही, त्यांच्यातील हुशारी, असलेलं शहाणपण अजून या लोकांनी पाहिली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, जो नेता असतो तो आपल्याभोवती आपल्या कामामुळे एक सकारात्मक ऊर्जा गोळा करू शकतो.