ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय व प्राधिकरण विचार मंच निगडी आयोजित “ओळख बांबूची”

0
363

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पर्यावरण पूरक बांबून पासून वस्तू बनवण्याचे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण व रोजगार निर्मिती करण्यासाठी तसेच प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी बांबून पासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना मोफत देण्यात आले यावेळी महिलांनी बांबुन पासून अनेक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले त्यामध्ये प्रामुख्याने की होल्डर. राखी. महिलांच्या कानातले. महिलांच्या गळ्यातील हार. पणती ठेवायचे स्टॅन्ड. असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण महिलांनी या शिबिरामधून घेतले मंगळवार 17/ 1/2023 रोजी सकाळी 11 ते 5:30 या वेळेत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले .

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मा. मनोज देवळेकर सर. यशवंतराव लिमये सर तसेच पालक महासंघाचे अध्यक्ष नितीन गावडे सर व मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले प्राधिकरण महिला विचार मंच अध्यक्ष स्वाती बाळा दानवले व पालक महासंघाचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व महिला वर्ग उपस्थित होते या प्रशिक्षणापासून प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी बांबून पासून वस्तू बनवण्याचा उद्योग पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्याचा व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सबलीकरण होण्यासाठी प्रामुख्याने या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश होता. या प्रशिक्षणामध्ये निगडी प्राधिकरण मधील पंचवीस महिलांनी सहभाग घेतला यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल याप्रकारे उदगार काढून ज्ञान प्रबोधिनी शाळेचे व प्राधिकरण विचार मंच यांचे आभार मानले