ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी योगी निरंजन नाथपालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड

0
2

आळंदी, दि. २२ : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी योगी निरंजन नाथसाहेब यांची तसेच २०२५ या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड झाल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मावळते प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी सांगितले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांचं बैठक प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप त्यांचे अध्यक्षते खाली झाली. यावेळी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख, योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते. या बैठकीत पुढील वर्षभराचे कालावधीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे झालेल्या बैठकीत कमेटीचे प्रमुख विश्वस्त पदी योगी निरंजन नाथसाहेब यांची निवड करण्यात आली. तसेच या वर्षीचे पालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांनी निवड करण्यात आली. या शिवाय आळंदी संस्थानचे स्कीम प्रमाणे प्रमुख व्यवस्थापक पदी सद्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी निवड जाहीर करण्यात आली. संस्थानचे तत्कालीन प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे अध्यक्षते खाली नुकतीच यासाठी बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली.
नवनिर्वाचित प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांना योगी शांतीनाथ यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आहे. साधक म्हणून मंदिरात अनेक वर्षांपासून सेवारत आहेत. स्व. भारुडकर डॉ. रामचंद्र देखणे यांचे माध्यमातून वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असलेले आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची पालखी सोहळा प्रमुख पदी निवड झाली आहे. ते राज्य परिसरात तसेच परदेशात देखील कीर्तन, प्रवचन, भारुड, आणि निरुपाचें माध्यमातून सेवारत आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा आळंदी देवस्थानचे वतीने मावळते विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे हस्ते तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वतीने निवडीचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, निखिल प्रसादे, विश्वम्भर पाटील, अर्जुन मेदनकर, कैलास आव्हाळे, सोपन काळे आदींचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
अनेक महिन्या पासून पदांचे फेरबदल निवडी प्रलंबित राहिल्या होत्या. माऊलींचा पालखी सोहळा पुण्यात आल्यावर परंपरेने संस्थानची बैठक होऊन निवडी पुण्यात जाहीर केल्या जात. तशी अनेक वर्षांची परंपरा होती. १ ऑगस्ट ला सर्वसाधारण पणे निवडी आणि कामकाज सुरु होत असे. यावेळी या निवडीस विलंब झाला. सद्या तीन विश्वस्त कार्यरत असून ३ विश्वस्त निवडी साठी देवस्थानने अर्ज मागविले असून उर्वरित ३ विश्वस्त निवड प्रक्रिया प्रलंबित आहे.