जॉनी जॉनी यस पप्पा!!लूटिंग पालिका,नो पप्पा!!नकली नोटांचा हार घालून केला निषेध

0
212

टीडीआर प्रकरणी आपचे पालिकेसमोर नोटांचे आंदोलन

पिंपरी, दि.29(पिसिबी) – टीडीआर घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर आयुक्त शेखर सिंग, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या प्रतिमेस नोटांचा हार घालून निषेध करण्यात आला.
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला खोट्या नोटांचा हार चढवला व टीडीआर घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

जॉनी जॉनी यस पप्पा!!
लूटिंग पालिका,
नो पप्पा!!
टेलिंग लाइज !!
नो पप्पा!!
टीडीआर घोटाळा ₹₹
हा हा हा हा हा हा !!

अश्या प्रकारच्या घोषणा देत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केल्या.

आम आदमी पार्टी च्या वतीने सदर विषय प्रकरणी खालील मागण्या करत आहे.

  1. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॅग (CAG) मार्फत चौकशी करण्यात यावी (मुंबई मनपा च्या धर्तीवर)
  2. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी नगर विकास खात्याचे देखील मंत्री असल्यामुळे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार जी जिल्ह्याचे पालक मंत्री असल्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्याचे स्पष्टीकरण देऊन सनदी अधिकाऱ्यांची (SIT) टीम बनवून सदर प्रकरणाची चौकशी करावी. 
  3. आयुक्त श्री. शेखर सिंह तसेच नगररचना व विकास, बांधकाम परवाना, स्थापत्य च्या सर्व अधिकाऱ्यांनी SIT मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. 
  4. २०१७ साला नंतर मनपा हद्दीतील सर्व टी. डी. आर प्रकरणांची (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी ?
  5. भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना दिलेला टी.डी.आर रद्द करण्यात यावा. 
  6. टंडन सोल्युशन प्रा.लि.या सल्लागारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.
    या वेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.