जैसलमेरमध्ये कोसळलं स्वदेशी बनावटीच तेजस फायटर विमान, पायलटने उडी मारून जीव वाचवला

0
243

भारताला सर्वात मोठा झटका बसला आहे. स्वदेशी बनावटीच तेजस फायटर विमान कोसळलं. शक्ति युद्धाभ्यास सुरु असताना हा भीषण अपघात झाला. मंगळवारी दुपारी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ही दुर्घटना घडली. जवाहर कॉलोनीजवळ ही दुर्घटना घडली. दुपारी 2 च्या सुमारास फायटर जेट हॉस्टेलच्या छतावर कोसळलं. तेजस कोसळल्यानंतर लगेच आगीच्या ज्वाळा भडकल्या. दोन्ही वैमानिकांनी विमानातून उड्या टाकून आपले प्राण वाचवले. या अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

इंडियन एअर फोर्सने या घटनेबद्दल माहिती दिलीय. राजस्थान जैसलमेर येथे भारताचा शक्ती युद्ध अभ्यास सुरु आहे. तेजस फायटर जेट शहरापासून 2 किलोमीटर दूर भील समाजाच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळलं. ही घटना घडली, त्यावेळी हॉस्टेल रिकामी होतं. त्यामुळे जिवीतहानी टळली. पोखरणमध्ये सुरु असलेल्या युद्ध अभ्यासाच्या स्थळापासून 100 किमी दूर ही घटना घडली.

तेजसमध्ये त्यावेळी एकच वैमानिक होता, असं एअर फोर्सकडून सांगण्यात आलं. त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. अचानक झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसरात दहशतक पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी जैसलमेर पोखरण येथे सैन्याचा युद्धाभ्यास पाहण्यासाठी उपस्थित आहेत.