जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधितांवर छापे

0
80

नवी दिल्ली, दि. ५ – नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीने (NIA) शनिवारी (5 सप्टेंबर) सकाळी एकूण 5 राज्यांतील 22 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. दहशतवादी कट आणि दहशतवादी फंडींगशी संबंधित प्रकरणांचा तपास करणे हा या मागचा उद्देश आहे. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली या राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. हे लोक जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता आहे.

एनआयएचे पथक मालेगाव, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमधून ही कारवाई केली आहे. यावेळी एटीएसचे पथकही उपस्थित होते. मालेगाव येथील एका होमिओपॅथी क्लिनिकमधून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जालन्यामधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या आरोप आहे .पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयास्पद साहित्यही जप्त केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी फंडींगच्या आरोपावरून छापेमारी
महाराष्ट्रापाठोपाठ एनआयएच्या पथकाने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातही छापा टाकला आहे. टेरर फंडिंगचा आरोप असलेल्या इक्बाल भट नावाच्या व्यक्तीच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. यासोबतच काश्मीरमधील इतर भागातही शोधमोहीम राबवण्यात आली आहे.

एनआयएने दिल्लीच्या मुस्तफाबाद भागातही छापा टाकला, यावेळी दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेलही सहभागी होता. येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. छाप्यादरम्यान एनआयएला काही संशयास्पद साहित्यही सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांची टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांसंदर्भात चौकशी सुरू आहे.
रामराजे निबांळकर आता शरद पवार गटात, तुतारी