जैन सोशल ग्रूप डायमंड पिंपरी चिंचवड च्या अध्यक्षपदी धवल पटेल

0
2

जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवडचा पदग्रहण सोहळा
हिंजवडी येथे 15 मार्च 2026 मराठमोळ्या राज्य अभिषेक पद्धतीने मोठ्या दिमाखात पार पडला.
धवल पटेल यांनी 2026-27 या वर्षासाठी अध्यक्ष पदाची शपथ घेतली. उपाध्यक्ष गिरीश कोठारी, मुख्य सचिव सिध्दार्थ शाह, उपसचिव धर्मेश कुमठ आणि कोषाध्यक्ष कुमार शाह यांनी तसेच इतर कार्यकारिणीने 2026 27 कार्यकालासाठी शपथ घेतली.लालचंदजी जैन यांनी सर्वाना शपथ दिली. या कार्यक्रमास जैन सोशल ग्रुप इंटर नॅशनल फेडेरेशन चे अध्यक्ष बीरेनजी शाह आणि महाराष्ट्र विभागाचे चेअरमन दिलीपजी मेहता यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जैन सोशल ग्रुपच्या महाराष्ट्र विभागाचे आणि पुणे विभागाचे पदाधिकारी तसेच डायमंड ग्रुपच्या सद्यस्यांनी आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या सुरवातीला गणेश वंदना आणि मर्दानी कला सादर झाली.
नवीन सचिव सिद्धार्थ शाह यांनी सर्वांचेआभार मानले.
सुरुची भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.