जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार

0
167

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी २०२४च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरुन सूचक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर आता पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील संबंध दुरावत चालल्याने महाआघाडी संकटात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी २०२४च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याच्या मुद्द्यावरुन सूचक वक्तव्य केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तर आता पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पवारांनी टाकलेली गुगली सर्वांना संभ्रमात पाडत आहे. अशातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.