जेष्ठ पत्रकार मदन जोशी यांचे निधन

0
407

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – चिंचवड येथील जेष्ठ पत्रकार मदन जोशी (वय-६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी,मुलगा मंदार, सून आणि नातू असा परिवार आहे. आज सकाळी ११.३० वा. त्यांचा अंतविधी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशाभूमीत होणार आहे.

फोटोग्राफर आणि पत्रकार म्हणून तब्बल ४० वर्षापेक्षा जास्त काळ अनेक दैनिके,साप्ताहिके,मासिके यामध्ये काम करणारे चिंचवड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी ( वय ६७ वर्षे ) यांचे मध्यरात्री १२.५० वा. स्टर्लिंग हॉस्पिटल भेळ चौक प्राधिकरण येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

मदन जोशी यांना नाट्य क्षेत्राची आवड होती.सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकामध्ये कलाकार म्हणून काम केले असल्याचे सांगितले जाते. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर होता.