जेष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांचे निधन

0
4

पुणे, दि. १६ (पीसीबी) – जेष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. दै. सकाळ, सरकारनामा साम वाहिनीमध्ये त्यांनी मोठी जबाबदारी सांभळली. पत्रकारांच्या संघटनेसाठी त्यांचे मोठे योगदान होते.
पत्रकारांतील अतिशय वेगाने काम करणारे आणि सर्व नवीन तंत्रज्ञान विद्युत गतीने आत्मसात करणारे धाडशी पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. सुवर्णपदक विजेता जलतरणपटू. साम वाहिनीचा पुण्याचा चेहरा. मोडी लिपीमध्ये पारगत.
अमित गोळवलकर यांच्या निधनाने माध्यमकर्मिंनी हळहळ व्यक्त केली आहे. राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा अमित आपल्यात नाही ही कल्पनाच करवत नाही. त्याने अकाली एक्झिट घेतली.