जेवण पार्सल देण्यावरून हॉटेल चालक आणि ग्राहकांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
200

जेवण पार्सल देण्यावरून हॉटेल चालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री चाकण येथे हिल टॉप हॉटेलच्या मागे घडली.

परवेज महंमद शेख (वय 34, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रचित महेंद्र धुमाळ (रा. पेठ, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख रविवारी रात्री धुमाळ याच्या हॉटेल मध्ये गेले. शेख यांनी जेवण पार्सल मागितले. त्यावरून धुमाळ याने ‘तू पार्सलचे पैसे दिले नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. हॉटेल मध्ये मटन बनवण्याच्या चमचाने शेख यांना मारहाण करून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात प्रचित धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परवेज महंमद शेख, पियुष धाडगे आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवेज याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना तू परवेज शेख याला जेवणाचे पार्सल का दिले नाही म्हणत आरोपींनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण करत जखमी केले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.