जेवणाचे पैसे मागितल्याने कॅन्टीन चालकाला मारहाण

0
83

हिंजवडी, दि. 17 : जेवणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाने कॅन्टीन चालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री नऊ वाजताच्या सुमारास जीएम कॅटर्स कॅन्टीन हिंजवडी फेस तीन येथे घडली.

अजय प्रताप कलेक्टर सिंग (वय 24, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन उकांडा पवार (वय 26, रा. धुमाळ वस्ती, माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय हे हिंजवडी फेस तीन येथे कॅन्टीन चालवतात. आरोपी गजानन पवार अजय यांच्या कॅन्टीनमध्ये जेवणासाठी आला. जेवणाचे 70 रुपये अजय यांनी मागितले. त्या कारणावरून गजानन याने अजय यांना शिवीगाळ करत स्टीलच्या पळीने डोक्यात मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.