जेफ्री एपस्टीन फाईलची खरी मास्टर माईंड गर्लफ्रेंड लेस्ली ग्रॉफ

0
102

अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणांचा खुलासा काही थांबेना. या फाइल्समध्ये आतापर्यंत त्याच्या जगभरातील बड्या हस्ती, दिग्गज, उद्योजक, राजकीय नेत्यांशी असलेला संबंध, त्याची संपत्ती, त्याच्या गर्लफ्रेंड आणि लैंगिक तस्करिच्या रॅकेटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागेने प्रसिद्ध केलेल्या कागपत्रांमध्ये एका महिलेचे नाव तब्बल १,५०,००० हून अधिक वेळा आले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून एपस्टीनशी सेक्रेटरी होती असे फाइल्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
कनेक्टिकटमधील न्यू कनान येथील रहिवासी लेस्ली ग्रॉफ हिचे नाव एपस्टीनच्या फाइल्समध्ये १.५ लाख वेळा आहे. या महिलेच्या नावाने जगभरात खळबळ उडाली आहे. लेस्ली जेफ्रीची एक्झिक्यूटीव्ही अस्टिंट म्हणून काम करत होती. २००१ ते २०१९ मध्ये तिने जेफ्रीच्या मृत्यूपर्यंत लेस्ली सावलीसारखी सोबत राहिली होती असे सांगितले जाते. तिने जवळपास २० वर्षे एपस्टीनची सहाय्यक म्हणून काम केले आहे. एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेलने मिळून तिची नियुक्त केली होती. जेफ्रीसोबत काम करण्यापूर्वी ती इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करायची.
कागपत्रांनुसार, २००१ ते २०१९ पर्यंतच्या जेफ्रीच्या लैंगिक तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये लेस्लीचाही सहभाग होता. ग्रॉफ एपस्टीनसाठी त्याचे वेळापत्रक, बैठका आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे काम करायची. कोणालाही एपस्टीनशी संपर्क करायचा असेल तर आधी त्याचा कॉल लेस्ली ग्रॉफला जायचा. जेफ्रीच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वांचे व्यवस्थापन लेस्ली ग्रॉफ करत होती असे कागपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे. वुडी अॅलन, स्टीव्ह बॅनन, प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या सेलिब्रिटींच्या संपर्कात लेस्ली राहायची.
मीडिया रिपोर्टनुसार, लेस्ली ग्रॉफविरोधात अनेक दिवाणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर मसाजच्या नावाखाली पीडितांसाठी बैठका आयोजित केल्याचा आरोप आहे. परंतु तिला कोर्टाने क्लीन चीट दिली असल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जेफ्री लेस्लीला लेस्लीला २००,००० डॉलर्सचा पगार होता. अहवालांमधील माहितीनुसार, तिच्याकडे सध्या कनानमध्ये असलेले घर ४.२ दशलत्र डॉलर्सचे असून गेल्या दहा वर्षांपासून आहे. तिला एपस्टीनने एक मर्सडिजही गिफ्टमध्ये दिली होती.