जुन्या सांगवीत बारा लाखांची घरफोडी

0
355

सांगवी, दि. १० (पीसीबी) – जुनी सांगवी येथे अज्ञातांनी घरफोडी करून 12 लाख 30 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 9) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घराच्या स्टोअर रूमचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले नऊ लाख 80 हजार रुपये किमतीचे 28 तोळे सोन्याचे दागिने, 25 हजार रुपये किमतीचे 500 ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन लाख 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 12 लाख 30 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.