जुन्या भांडणावरून तरुणावर कोयत्याने वार

0
113

दि. २३ जुलै (पीसीबी) सांगवी,
जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.

अंबादास मोहन पासलकर (वय 29, रा. पिंपळे निलख) असे जखमी तरुणाचे नाव आहे.त यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत राठोड (वय 24), राजू देशमुख, स्वप्नील कांबळे, विनोद कांबळे, शेखर देशमुख, दत्तादादा कांबळे (वय 22, सर्व रा. बाणेर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी पासलकर यांना शिवीगाळ करून कोयत्याने डोक्यावर वार केले. रबरी पाईप, सायकल चेन आणि हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.