जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

0
303

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.

किशोर दिलीप कसबे (वय 24, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवी रवी साखरे (वय 19), मोसिन शेख (वय 25), निखिल गायकवाड (वय 19), प्रथमेश गायकवाड (वय 21), हरज्योत इंद्रजीत (वय 20, सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कसबे हे रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत येथून पायी चालत घरी जात होते. ते भाजी मंडई समोर आले असता आरोपींनी त्यांना अडविले. त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी कसबे यांना दगडाने, हाताने मारहाण केली. तसेच आरोपी साखरे याने कसबे यांच्या डोक्यात कोयत्याने मारून त्यांना जखमी केले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.