जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांवर कोयता, तलवारीने वार

0
376

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांवर कोयता आणि तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री खेड तालुक्यातील च-होली खुर्द येथे घडली.

पिंटू रामदास जाधव (वय 22, रा. च-होलीखुर्द, ता. खेड), अंकुश गांगड अशी जखमींची नावे आहेत. जाधव यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा उर्फ बाब्या ठाकर, अजय ठाकर, सुरज भालेकर, अक्षय भालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी त्यांची बहिण, दाजी अंकुश गांगड हे आखाड जेवणासाठी आले होते. जेवण सुरु असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दाजींना घरातून ओढत बाहेर नेले. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या दाजीवर कोयता आणि तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.