जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

0
92

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) :

जुन्या भांडणावरून वाद घालत कुटुंबातील सदस्यांनीच दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवारवाडी येथे घडली.

याप्रकरणी हिंजवडीतील गवारवाडी येथील फेज तीनमधील महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासऱ्याने ते राहत असलेल्या ठिकाणी ठाकरवस्ती येथे फिर्यादी यांना बोलावून घेत जुन्या भांडणाचा वाद घालत फिर्यादीच्या हातावर काठीने मारहाण केली. तसेच दीराने फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर महिला आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.