जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणास मारहाण

0
89

पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी)

जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झिरो बॉईज चौक पिंपरी येथे घडली.

रोहन संजय घेवंदे (वय 21, रा. झिरो पॉईंट चौक पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज (वय 19), संजय भाजगीर (वय 20), जावेद (वय 19), सुधीर (वय 22, सर्व रा. महात्मा फुले नगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी घरी असताना आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना वाईट शिवीगाळ करून हाताने, कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताला, पायाला, पाठीत आणि डोक्यावर दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.