जुन्या भांडणाच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
83

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : जन्माष्टमीच्या कार्यक्रमांमध्ये तू का ढकलले या किरकोळ कारणावरून एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) गहुंजे येथे घडली.

याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अरुण मोहनसिंग प्रतापसिंग (वय 19 रा. गहुंजे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी परीक्षित भंडारी, ध्रुव नरुला, आर्या मिश्रा, कार्तिक गुप्ता, मिया खान, हसन शेख , अभिनव माळी , सिद्धार्थ यादव या आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात फिर्यादी यांनी परिक्षित भंडारी याला ढकलले होते. या रागातून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने व बेल्टने मारहाण केली. तसेच याबाबत तक्रार केल्यास तुला बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली. यावरून शिरगाव पोलिसांनी आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.