जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांना माराहण

0
904

भोसरी, दि. १० (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणाहून महिलेने एकाच कुटूंबातील पाच व्यक्तींना मारहान केली. ही घटना सोमवारी (दि. 8) विश्वेश्वर चौक एमआयडीसी भोसरी या ठिकाणी घडली.

प्रेम सुधीर जावळे (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी महिला आणि फिर्यादी यांच्या कुटूंबाचे जुने वाद आहेत. या वादातून आरोपी महिलेने फिर्यादी यांचा चुलत भाऊ, चुलता, आजी, आजोबा आणि बहिणीला लाथाबुक्क्यांनी तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहान केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.