जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आले आणि पुन्हा वाद झाला; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

0
452

मोशी, दि. ८ (पीसीबी) – जुना वाद मिटवण्यासाठी एकत्र आले असता एक व्यक्ती आणि महिला यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. ही घटना बुधवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चोविसावाडी येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दत्ता कारभारी कायंदे (वय 36, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कायंदे याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या घरात येऊन यापूर्वीची केस परत घे, या कारणावरून शिवीगाळ करून हाताने व दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात दत्ता कारभारी कायंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिला यांच्यामध्ये जुने वाद होते. ते मिटविण्यासाठी चर्चा करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. महिलेने कायंदे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कायंदे यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लोखंडी रोडने पायावर मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.