जुगार प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

0
89

आळंदी, दि. २० (पीसीबी)
रम्मी जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हे शाखा युनिट तीन ने कारवाई केली. त्यांच्याकडून नऊ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) सायंकाळी चऱ्होली खुर्द येथे करण्यात आली.

बापू बबन पारधी (वय ४५), आत्माराम फकीरबुवा शेळके (वय ५५), शिवाजी रंगनाथ धुळगड (वय ६६), सुरेश किसन शिंगारे (वय ४२, सर्व रा. चऱ्होली खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खुर्द गावच्या हद्दीत ठाकरवाडी जवळील जंगल परिसरात आरोपी बेकायदेशीरपणे रम्मी जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींकडून नऊ हजार ९५० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.