पिंपरी, दि. १० –
आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिस अमलदार अमर अजिनाथ राणे यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अतुल सुलाभ घोगरे (वय ३६, रा. थेरगाव), ज्ञानेश्वर राजाराम ठाकुर (५०, थेरगाव गावठाण), विनायक महादेव एरंडे (३४, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव), राजेंद्र काशिनाथ थोरात (५६, रा. काटेवस्ती), साधु दत्तोबा गुजर (६१, रा. थेरगाव गावठाण) व मच्छिंद्र भागुजी बारणे (५४, रा. क्रांतिवीरनगर थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रम्मी नावाचा पत्त्याचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर कारवाई करत १९ हजार ४५० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे.