पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – रोज वाढणा-या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. या रोज वाढणा-या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना सोमवार दिनांक १८/०७/२०२२ पासून केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर वाढवलेल्या “जी एस टी”ची भर पडली आहे. या विरुध्द सर्व नागरिकांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांचा निषेध करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
करोना साथीच्या मंदीतून जग सावरायला लागले असताना भडकलेले इंधनदर आणि महागाईचा चढता आलेख यात सोमवार दिनांक १८/०७/२०२२ पासून केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर वाढवलेल्या “जी एस टी”ची भर पडली आहे. दैनंदिन वापरातील या वस्तू महाग झाल्याने त्याचा आर्थिक बोजा थेट सर्वसामान्य नागरीकांवर पडणार आहे. सर्वसामान्य नागरीकांना पॅकड, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी जादा दाम मोजावे लागणार आहेत. यामध्ये दही, ताक, पनीर, पीठ, सोयाबीन, मटार, गहु आणि अन्य धान्य महाग होणार आहे. या सर्वांवर आता 5 टक्के “जी एस टी” मोजावा लागणार आहे. यासोबतच ५,००० रुपयांहून अधिक भाडे असलेली रुग्णालयाची खोली, एक हजार रुपये दररोजचे भाडे असलेली हॉटेलमधील रुम यांच्यासाठी ही “जी एस टी” द्यावा लागणार आहे. महागाईचा हा भस्मासुर सर्व सामान्य जनतेला गिळून टाकेल ही भाववाढ थांबली पाहिजे. या मागणीसाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आकुर्डीतील जी एस टी कार्यालयासमोर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. कैलास कदम बोलत होते.
यावेळी वरिष्ठ शहर उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक आण्णा दहितुले, विश्वास गजलमल, पिंपरी विधानसभा ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी विधानसभा ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, चक्रधर शेळके, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, स्वाती शिंदे, छायावती देसले, अबूबकर लांडगे, किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, उमेश बनसोडे, जेव्हीयर ॲन्थोनी, जुबेर खान, पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, सुप्रिया कदम, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, आबा खराडे, नितीन खोजेकर, हिराचंद जाधव, सतिश भोसले, हरीश डोळस, मोहसिन शाह, रवि नांगरे, रवि कांबळे, मेहबूब शेख, किरण नढे, इरफान शेख, फिरोज तांबोळी, आकाश शिंदे, दीपक भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोट्यावधी नागरिकांचा रोजगार गेला आहे. सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांना मुलांची शालेय फि भरणे अवघड झाले आहे. जीवनाश्यक वस्तू देखील माणूस खरेदी करु शकत नाही. गरीबांना संसार करणे देखील आता अशक्य झाले आहे. या भाववाढीला लगाम घालणे गरजेचे आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करु, डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेऊ अशी आश्वासने देऊन सत्ता मिळवलेल्या भाजपाने अगदी याच्या विरुध्द काम केले. केंद्रातील भाजपा सरकार करीत आहे अशीही टिका डॉ. कैलास कदम यांनी यावेळी केली.आकुर्डीतील जी एस टी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त श्री विश्वनाथन यांना जिवनावश्यक वस्तूंवर अन्यायकारक वाढविण्यात आलेली “जी एस टी” दर रद्द करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.












































