जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न आरोपी अटकेत

0
1346

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी अविनाश कुसाळकर (वय 21 रा.पिंपरी) याला याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात बळजबरी घुसून आरोपीने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवला तसेच तोंड दाबून फिर्यादी व त्यांच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील कपडे फाडत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर बेकायदा शस्त्र बाळगणे धमकावणे तसेच बलात्काराचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.