जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची वृत्ती हवी -चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी

0
69

पिंपरी, दि. १४ जुलै (पीसीबी) – आयुष्यातला प्रत्येक दिवस अडचणीचा असतो, आपण कधी त्या अडचणींनी खचून जातो , धडपडतो. खरचटते , लागते. त्यानंतर आपण उभे राहतो की नाही हे खरे स्पिरिट असते. प्रत्येक अडथळ्याचे समाधान वेगवेगळे असते मात्र अडथळ्यांना सामोरे जाण्याची वृत्ती हवी असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी यांनी येथे केले

 

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष कै. इंद्रमन सहदेव सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ भोसरीतील अंकुश लांडगे सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्वप्निल जोशी बोलत होते


समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, डॉ.प्रताप सोमवंशी , एस.बी.पिल्लई , जागृती धर्माधिकारी , बाळासाहेब किसान बोराटे, दादाराव गायकवाड, शुभांगी लांडे, आनंदराव मुंगसे , , सनी निम्हण, सतीश गव्हाणे, वैशाली अजित गव्हाणे, जयवंत आल्हाट, एकनाथ दाहितुले, डॉ. नीलेश लोंढे, विहार सेवा ग्रुप यांना तर जीवन गौरव पुरस्कार दशरथ लांडगे व चांदमल लुंकड यांना देण्यात आला.


कार्यक्रमात प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमास चित्रपट अभिनेत्री नम्रता गायकवाड, नेहा खान , माजी महापौर मोहिनी लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, भरत लांडगे, शिवसेनेचे निलेश मुटके आदी उपस्थित होते.
यावेळी नम्रता गायकवाड म्हणाल्या की फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आल्यावर मध्यमवर्गीय असल्याने अनेक निगेटिव्ह गोष्टी ऐकण्यात आल्या. पुढे मंगळसूत्र मालिकेत अलका कुबल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली . सुसंस्कृत होण्याची लक्षणे अलकाताईंकडून मला शिकता आली. बाई ग चित्रपटात मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. मल्याळम चित्रपटातही आपण भूमिका करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र सिंह यांनी प्रास्ताविक केले केले. कार्यक्रमाचे नियोजन संदीप सातार्डेकर व प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांनी केले