जीएसटी विरोधात १६ जुलै रोजी व्यापाऱ्यांचा कडक बंद

0
334

पुणे, दि. १४ (पीसीबी) – अन्नधान्य आणि खाद्यान्नावर (नॉन ब्रँडेड) पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी (१६ जुलै) देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यातील अन्नधान्य व्यापारी सहभागी होणार आहेत. राज्यातील अन्नधान्य व्यापाऱ्यांची परिषद मार्केट यार्डातील व्यापारी भवन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बंदमध्ये राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अन्नधान्यावर जीएसटी आकारण्याच्या निषेधार्थ राज्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.

राज्यातील जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. शनिवारी (१६ जुलै) रोजी देशभरातील अन्नधान्य व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारे व्यापारी सहभागी होणार आहे. या बंदला राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे, असे दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.