जिवे मारण्याची धमकी देत बिजलीनगर मधून दुचाकी पळवली

0
98

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) चिंचवड,
जीवे मारण्याची धमकी देत तरुणाची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बळवंत चौक, बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.

अनिकेत विजयकुमार मराठे (वय 19, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील मारुती लोणी (वय 22, रा. बिजली नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मराठे हे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास बळवंत चौक विजयनगर येथून दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपी लोणी तिथे आला. त्याने मराठे यांना ‘तुझी गाडी दे नाहीतर तुला कापून टाकेल’ अशी धमकी दिली. त्यानंतर मराठी यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. पोलिसांनी आरोपी सुनील लोणी याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.