जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ उर्फ आबा लांडगे यांचे निधन

0
493

खडकवासला, दि. २९ (पीसीबी) – माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ उर्फ आबा लांडगे (वय-५६) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे खडकवासला मतदार क्षेत्र, हवेली तालुका,शिवगंगा खोर,सिंहगड परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्य श्रीरामनगर ,बांडेवाडी, खेड शिवापूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.

आबांबरोबर कित्येक वर्ष काम केलेले शिवसैनिकांंनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.. सामाजिक बांधिलकी असणारा असा हा सच्चा सामाजिक कार्यकर्ता, नेता. सत्य न्याय सेवा संघर्ष आणि संयम या सर्वांचा मित्र होता. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी आदरांजली शिवसैनिकांनी वाहिली आहे.