पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड, इंदिरानगर येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने 29 ते 31 जुलै 2022 दरम्यान जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रेमलोक पार्क येथील कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रात सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हास्तर कॅरम स्पर्धा 2022-23 या स्पर्धेत पुरुष, महिला गट व ज्येष्ठ नागरिक गट असे एकूण 400 खेळाडू सहभागी होणार आहे. विज्येत्या खेळाडूंना रोख बक्षीसे, ट्रॉफीज देण्यात येणार आहेत. पुरुष गटात प्रथम येणा-याला 31 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 20 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक 15 हजार रुपये, पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला 7 हजार रुपये, ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.
एकूण 1 लाख 26 हजार 200 रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक गटात प्रथम येणा-याला 15 हजार, द्वितीय 11 हजार, तृतीय 7 हजार, चतुर्थ 5 हजार आणि पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला 3 हजार रुपये तर ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे अशी एकूण 57 हजार 200 रुपयांची या गटाला बक्षीसे दिली जाणार आहेत. तर, महिला गटात प्रथम येणा-याला 7 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 3 हजार, चतृर्थ 2 हजार आणि ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिशची 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. या गटात 24 हजार 200 रुपये तर तीनही गटातील विज्येत्यांना 2 लाख 7 हजार 600 रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.