जिल्हापरिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू होणार

0
1

मुंबई, दि. २७ –
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणा-यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात निर्णय शक्यता होण्याची आहे. सातारा आणि औंध गॅझेटियरमध्ये कोल्हापूर आणि सोलापूरच्या मराठ्यांचा समावेशच नाही. यामुळे सातारा गॅझेटियरचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मिळण्याबाबत साशंकता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅजेट लागू करण्यात अडचणी येत आहेत. समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅजेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली. सध्या हैद्राबाद गॅझेट लागू केल्याने मराठ्यांना कुणबी ओबीसी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा गॅझेट लागू केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणा-यांना OBCतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी, सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. 1885चं शासकीय राजपत्र म्हणजेच गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे. त्यांच्या वंशपरंपरा एकच आहेत. विवाह पद्धती धार्मिक कार्यक्रम आणि आडनावे त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅझेटमध्ये आढळते. 1885च्या सातारा गॅझेटियरमध्ये 1881च्या जनगणनेत 5 लाख 83 हजार कुणबी नोंद असल्याचं नमूद आहे. सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1819मध्ये जनगणना राबवली होती. ही जनगणना जातनिहाय होती. या जनगणनेत शेती करणा-या मराठ्यांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात. ज्यांचा व्यवसाय शेती आहे मात्र ते मराठा समाजातील आहेत, त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो. हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली. सध्या चर्चेत असलेल्या 1885च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात. शिवेंद्रसिंहराजे यांच्या डोक्यावर हा काटेरी मुकुट ठेवला गेल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. 1885 गॅझेटिअर आणि त्यामागील नोंदीचा फायदा नक्कीच सातारा आणि पुणे जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांना होईल मात्र पुन्हा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांना त्यांचा वेगळ्या गॅझेटिअरची मदत घ्यावी लागणार हे मात्र नक्की.. यासाठी मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करावं लागणार की काय अशी चर्चा मराठा समाजात सुरु झालीये.