जिल्हाधिकारी सुहास दिवसे होणार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त ?

0
34

पिंपरी,दि. 31 (पीसीबी) – मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्या समोर ठेवून राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची दोन दिवसांत बदली होणार असून त्याचा पदभार पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे येण्याची शक्यत आहे. दरम्यान, याबाबत खुद्द शेखर सिंह यांच्याशी संपर्क केला असता तशी कोणती माहिती नाही आणि शक्यताही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त शेखर सिंह यांची १६ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. अद्याप सहा महिने त्यांची कारकिर्द संपायला बाकी आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी खासबाब म्हणून त्यांची शहरात नियुक्ती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या सोयिचे अदिकारी म्हणून सुहास दिवसे, योगेश म्हसे किंवा राजेंद्र देशमुख यांच्यापैकी एकाकडे हा पदभार सोपवायचा होता.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकित पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महिनाभरात सरकार स्थिरस्थावर होताच त्यांनी आता स्वच्छ कारभार देणारे, कार्यक्षम अधिकारी मोक्याच्या ठिकाणी देण्यासाठी आदलाबदली सुरू केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हा ताब्यात असावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुध्दा आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आग्रही आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी शेखर सिंह यांच्या जागेवर त्यांना सुहास दिवसे किंवा राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती पाहिजे आहे, असे समजले.