जिन्यात जेवण सांडल्याने महिलेस मारहाण

0
60

दिघी, दि. 16 (प्रतिनिधी)

जिन्यामध्ये जेवण सांडल्याने चार महिलांनी एका महिलेला मारहाण केली. ही घटना तीन सप्टेंबर रोजी दुपारी संत गजानन महाराज नगर दिघी येथे घडली

याप्रकरणी जखमी महिलेने शुक्रवारी (दि. 15) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी यांच्याकडून इमारतीच्या जिन्यामध्ये जेवण सांडले. या कारणावरून आरोपी महिलांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाण करून जिन्यातून ढकलून दिले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.