जिन्याच्या दरवाजावाटे घरात घुसून सोने व रोख रक्कम लंपास

0
117

दि. २० ऑगस्ट (पीसीबी )चाकण,
बंद घराच्या जिन्याच्या दरवाजावाटे घरात घुसून चोराने घरातून सोने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवरी (दि. 18) सकाळी खेड तालुक्यातील वाकी येथे उघडकीस आली.

सागर मधुकर जगताप (वय 36 रा वाकी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोराने जिन्याच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्याने घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवर मधून सोने व रोख रक्कम असा एकूण 73 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.