जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

0
519

भोसरी, दिं ३० (पीसीबी) –  शहर असो वा ग्रामीण भाग, गौरी-गणेशाचा सण म्हणजे… उत्साहाला उधाण! त्यातही अधिक तयारी गणेशासाठी सजावट-आराशीची, तर गौराईसाठी नागपंचमीपासूनच झिम्मा-फुगड्यांची! माहेरवाशिणीला माहेरची ओढ लावणारा आणि सासुरवाशीणीची लगबग वाढविणारा महालक्ष्मीचा म्हणजेच गौराईचा सण चोहोदुर अतिशय भक्तिभावात आणि आनंदात साजरा होत असतो.भाद्रपदात गणपतीबाप्पाच्या आगमना नंतर काही दिवसांमधेच घरोघरी गौराईचे आगमन होते. अर्थात ज्यांच्याकडे महालक्ष्म्या पुर्वापार आहेत किंवा नवसाने त्या स्थापीत केल्या जातात अन्यथा कुणाकडे त्या पाहुण्या म्हणुन देखील स्थापीत करण्यात येतात.आपण त्यासाठी सुंदर असे देखावे देखील करत असतो .

या वर्षी देखील जिजाई प्रतिष्ठानने गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे . या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता .
सौ.सिमाताई सावळे ९९२२५०१६०७
सोफिया खान ८४४६२९०९०७
श्री. संदिप नलावडे ९७६३४७९३५५
श्री. अरुण गरड ९७६७०३१६७०
श्री. अनिकेत पोतदार ७२४९१०७२६०
श्री. संदेश प्रधान ७६६६९६४३३५

तुम्ही केलेल्या गौरी सजावटीसाठी माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सीमा सावळे या स्वतः तुमच्या घरी येऊन परीक्षण करतील .. आणि विजयी गृहिणींना आकर्षक बक्षीसं देखील देण्यात येतील.

यामध्ये प्रथम क्रमांकासाठी चांदीचे पैंजण ,द्वितीय क्रमांकांची चांदीचे जोडवे ,तृतीय क्रमांकासाठी कुंकवाचा करंडा आणि तसेच १० उत्तेजनार्थ बक्षिसं देखील देण्यात येतील. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी केलं आहे. तर मग आजपासूनच नावनोंदणी करा आणि बक्षिसं जिंका .