जास्त पैशांची मागणी करत वाहन मालकाला मारहाण

0
207

बदली ड्रायव्हरने ठरलेल्या पैशांपेक्षा अधिकचे पैसे मागत वाहन मालकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता निगडी येथे घडली.

इस्माईल लाडलेमशाक डिंडवार (रा. ओटास्कीम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आकाश दिलीप जायभाय (वय 24, रा. चाकण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जायभाय यांच्या मामाच्या ट्रकवर बदली ड्रायव्हर म्हणून आरोपी इस्माईल याला पाठवले होते. इस्माईल याने ठरवलेल्या पैशांपेक्षा 500 रुपये जास्त मागितले. ते पैसे देण्यासाठी फिर्यादी जायभाय हे निगडी मधील भक्तीशक्ती चौकात आले. तिथे इस्माईल याने जायभाय यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर त्याने कमरेला खोचून ठेवलेला कोयता काढून जायभाय यांना मारण्यासाठी आला. आरोपीला घाबरून जायभाय तिथून पळून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.