जास्त परताव्याच्या आमिषाने एकाची दोन लाखांची फसवणूक

0
324

मोशी, दि. २० (पीसीबी) – टास्क देऊन जास्त परताव्याच्या बहाण्याने नागरिकाची 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 1 जुलै 2023 रोजी नेटबँकींगद्वारे मोशी येथे घडला आहे,

यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादीनी मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरून दोन टेलिग्राम युजर्स व 8988521082 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी संपर्क साधत त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे जास्त परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क पुर्ण करून घेतले. फिर्यादी यांना वेळोवेळी विविध बँक खात्यावर 2 लाख 3 हजार 700 रुपये भरायला सांगून त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे. यावरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.