तळेगाव,दि.२२(पीसीबी) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची 14 लाख रुपये करणाऱ्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सारा प्रकार ऑक्टोबर 2022 ते गुरुवार (दि.21) तळेगाव दाभाडे येथे घडला.
याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.21) फिर्यादी दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी नीरज कुमार विश्वंभर शाही (वय 43 तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एका स्कीम मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी फिर्यादी ला तब्बल 12 लाख 70 हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते गुंतवले असता त्यांना परतावा म्हणून 1 लाख 52 हजार 400 रुपयांचे आमिष दाखवण्यात आले. परंतु आज अखेर फिर्यादी यांना मूळ रक्कम व त्यावरील परतावा अशी 14 लाख 22 हजार 400 रुपये परत न करता फसवणूक केली आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.