जावायाने केली सासर्‍याची ८३ लाखांची फसवणूक

0
118
187143521

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) निगडी,

सासर्‍याच्‍या नावावर कर्ज काढण्‍यास भाग पाडून त्‍यांची ८३ लाख ६८ हजार ८६५ रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे घडली.

चेतन दत्‍तात्रय मोरे (वय ३० रा. जांभूळवाडी रोड, विठ्‌ठलवाडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्‍याची पत्‍नी पूजा चेतन मोरे (वय ३१, रा. दुर्गामाता हौसिंग सोसायटी, निगडी) यांनी गुरुवारी (दि. २२) याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१९ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत निगडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी पूजा यांचे पती आरोपी चेतन मोरे याने त्याचा पहिला विवाह झालेला असताना व त्याचा कायदेशीर घटस्फोट झाला नसताना फिर्यादी व त्‍यांच्‍या घरच्‍यांपासून लपवून ठेवले. फिर्यादी पूजा यांच्‍या सोबत हिंदु रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. फिर्यादी यांना त्याचे घरी नांदायला घेऊन गेले नाही. तसेच व्‍यावसाय सुरू करण्यासाठी फिर्यादी व तिच्या वडिलांकडून वारंवार कर्ज काढुन पैसे घेतले. त्‍यानंतर अधिकचे पैसे देण्‍यास नकार दिल्‍यावर साईनाथ नगर, निगडी येथील फिर्यादी यांचे रहाते घरी व शिरगाव येथील फ्लॅटवर असताना फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करुन नांदायला घेऊन जाणार नाही, अशी धमकी दिली. तसेच ८३ लाख ६८ हजार ८६५ रुपयांचे कर्ज काढण्‍यास भाग पाडून फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.