जावयाला कोयत्याने मारहाण

0
307

दापोडी, दि. २१ (पीसीबी) – जावयाने मुलीला मारहाण केल्याने मुलगी माहेरी आली. तिला न्यायला आलेल्या जावयाला सासरा आणि मेव्हण्याने शिवीगाळ करून कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १९) रात्री साडेअकरा वाजता सिद्धार्थनगर, दापोडी येथे घडली.

सचिन एकनाथ वाघमारे (वय ३२, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ शंकर कांबळे (वय ५०), राकेश नागनाथ कांबळे (वय ३२, दोघे रा. सिद्धार्थनगर, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे यांच्या पत्नीने स्वयंपाक केला नाही, या कारणावरून त्यांनी पत्नीला मारहाण केली. त्यावरून वाघमारे यांची पत्नी माहेरी निघून गेली. तिला घेऊन येण्यासाठी वाघमारे सासरी गेले. त्यावेळी त्यांचे सासरे नागनाथ आणि मेव्हणा राकेश या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. वाघमारे यांनी त्यांना शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारला. त्यानंतर नागनाथ आणि राकेश या दोघांनी वाघमारे यांना हाताने मारहाण करून डोक्यात कोयता मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.