जाब विचारल्याने मारहाण

0
46
crime

बावधन,दि.11 (पीसीबी)
शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याबाबत जाब विचारल्याने सहा जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी भुंडे वस्ती, बावधन येथे घडली.

राजेंद्र राजपूत, उणेश राजपूत, अरविंद राजपूत आणि तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहित अनिल राजपूत (वय ३०, रा. भुंडे वस्ती, बावधन) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कामगार कामावर जात असताना आरोपींनी त्याला शिवीगाळ करून काठीने मारण्याची धमकी दिली. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपींनी फिर्यादी, त्यांचे कुटुंबीय आणि कामगाराला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या आईच्या पायावर दगड मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.