जाब विचारल्याने भंगार व्यावसायिकास मारहाण

0
411

समोरच्या दुकानात भंगार का टाकले, असा जाब विचारल्याने एका भंगार व्यावसायिकाने दुसऱ्या भंगार व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या सुमारास निघोजे मोई रोडवर, मोईगाव येथे घडली.

मारूफ मकबूल खान (वय 29, रा. मोई) यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीराम यादव (रा. मोई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही भंगार व्यवसायिक आहेत. फिर्यादी खान यांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलांना 500 रुपये ऍडव्हान्स दिला होता. असे असतानाही त्या महिलांनी आरोपी यादव याच्या भंगार दुकानात भंगार टाकले. त्याबाबत खान यांनी महिलांना जाब विचारला. त्या कारणावरून यादव याने खान यांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.