जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण

0
689

चाकण, दि. १९ (पीसीबी) – गाडीला कट का मारला असा जाब विचारणाऱ्या तरुणाला तिघांनी लोखंडी रॉड आणि बेल्टने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री बीड वस्ती कॉर्नर, चाकण येथे घडली.

संतोष आयान छोटू शेख (वय 25, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण पांडुरंग सुरवसे (वय 19, रा. चाकण), ईश्वर गालफाडे आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बीड वस्ती कॉर्नर चाकण येथून दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीने फिर्यादीच्या गाडीला कट मारला. त्याचा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादी जखमी झाले. दरम्यान फिर्यादी यांचा भाऊ घटनास्थळी आला असता आरोपी तिथून पळून गेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.