जाब विचारला म्हणून तरुणाला कोयत्याने मारहाण

0
123

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) महाळुंगे
गाडी खाली पडल्याचा विचारला म्हणून एका तरुणाला कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 18) खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

आकाश उर्फ गणेश दत्तू काळे (रा. कुरकुंडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद विलास ढोरे (वय 37, रा. कुरकुंडी,खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्याची दुचाकी पार्क केली होती. पार्क केलेल्या दुचाकीला आरोपीने लाथ मारून खाली पाडले. यावेळी फिर्यादी यांनी तू माझी दुचाकी खाली का पडली, असा जाब विचारला. या रागातून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत कमरेचा कोयता काढून खांद्यावर, पाठीवर, हातावर वार करत गंभीर जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.