जाब विचारला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

0
230

देहुगाव, दि. ५ (पीसीबी) – चुलत भावाच्या गाडीला कट का मारला याचा जाब विचारला म्हणून तरुणाला कोयत्याने व लोखंडी रॉड ने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) देहुगाव येथे घडली.

याप्रकरणी धीरज गुलाब टिळेकर (वय 28 रा. देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अभिजीत ऊर्फ मोन्या विलास टिळेकर, प्रतिक ऊर्फ सोन्या विलास टिळेकर ( रा. देहुगावं) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांना फिर्यादी ने गाडीला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून चिडून जावून फिर्यदीला शिवीगाळ करत डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयता मारला. यावेळी फिर्यादीनुसार चुलत भावाच्या पाठीत रॉड ने मारहाण केली. या वरून देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तापस करत आहेत